3 मे ला दुपारी चार वाजता करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर यांनी महेश कवडे या नावाने कंट्रोल रूमला फोन करून पुणे रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्ब असल्याचं सांगितलं होतं...
तसेच बॉम्ब कुठे ठेवला आहे, याची माहिती हवी असल्यास सात कोटी रुपये द्या अशी मागणी आरोपींनी पोलिसांकडे केली होती. मात्र त्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देणाऱ्या दोन आरोपींना पुणे रेल्वे पोलिसांनी वाघोलीतून अटक केली आहे. करण भिमाजी काळे आणि सुरत मंगतराम ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.