मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा यांचे पठण केल. हिंदू मुस्लिम ऐक्याची पार्श्वभुमी असलेल्या केशेगाव येथे सायंकाळी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले व नमाज अदा केली त्यानंतर टाळ्या वाजवत हिंदू मुस्लिम बांधव एकत्र हनुमान चालीसा पठण केली.
मशिदीवरील भोंगे बंद करा यासाठी राज्यभरात आज मनसेकडून भोंग्या संदर्भात अल्टिमेट देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या नेतृत्वात बीडमध्ये हनुमान चालीसाचे वाचन करण्यात आले. शहरातील माळीवेस येथे मस्जिद समोर असणाऱ्या हनुमान मंदिरात मनसे पदाधिकाऱ्यांनी मंदिरातील घंटा वाजवीत हनुमान चालीसाचे वाचन केले. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. बीडमध्ये सकाळी अनेक मस्जिद मध्ये भोंगा न लावता नमाज अदा करण्यात आली. त्यामुळं मनसेकडून मुस्लिम बांधवांचे स्वागत देखील करण्यात आले. भोंगा बंद नाही झाल्यास मनसे कडून लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाचण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
जातीय तेढ निर्माण झाल्यास कारवाई करण्याचा इशारा
जिल्ह्यातील विविध मशिद परिसरात पोलिसांचा बंदोबस्त
अल्टिमेटम संपल्यानंतर आज सकाळपासून जिल्ह्यातील विविध मशिदींमध्ये नियमितपणे झाली अजान
मनसे कार्यकर्त्यांनी मात्र राज्य सरकारच्या भूमिकेवर केली टीका
भारतीय मुस्लिम परिषदेने राज ठाकरे यांच्या भूमिकेचा तीव्र प्रतिकार करण्याचे केले आवाहन
महाआरतीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना नेले पोलिस ठाण्यात
उमरखेड येथे हनुमान चालीसाचे पठण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पवित्रा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात उपसले हत्यार
उमरखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिरात हनुमान चालीसाचे पठण
मुंबईत एकूण 1,140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 लाऊडस्पीकर आज वापरण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे या 135 मशिदींवर कारवाई करण्यात येणार आहे.
सोन्याचा भाव 51 हजार 500 रू.
चांदीचा भाव 65 हजार 100 रु.
सोन्याच्या भावात 400 रू. वाढ झाली आहे व चांदीचा भावात 400 रू. घसरण झाली आहे.
बाळासाहेबांनी मशिदींबाबत मांडलेल्या भूमिकेची राज यांच्याकडून आठवण
— Raj Thackeray (@RajThackeray) May 4, 2022
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भूमिका घेतली, त्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांना सहकार्य करत अजान वाजवले नाहीत... त्यामुळे मनसेला सहकार्य केल्याबदल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
मस्जिदी वरील भोंग्या समोर हनुमान चालीसा लावून उत्तर मनसे कडून देण्याच्या राज गर्जने नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते आज पहाटे पासून आंदोलनाच्या तयारीत असताना भिवंडी पडघा येथे पहाटे 5.12 ची अजान भोंग्यावर न दिल्याने मनसे कार्यकर्त्यानी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली नाही .परंतु तत्पूर्वीच परिसरात चोख असा बंदोबस्त पोलिसांनी लावला होता .तर भिवंडीत नवीबस्ती मार्कंडेय मंदीर या ठिकाणी सुध्दा काही कार्यकर्ते येऊ शकतात यासाठी पोलीस रस्त्यावर तैनात होते. तर शहराध्यक्ष मनोज गुळवी यास तीन कार्यकर्त्यांसह पहाटे 4.45 वाजता शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.