Maharashtra Floor Test : अपात्र आमदारांना मतदान करता येणार
अपात्र आमदारांना मतदान करता येणार
सर्वोच्च न्यायालयाने विश्वादर्शक ठरावास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. बहुमत चाचणी उद्याच होणार आहे. तसेच विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या शिंदे गटातील आमदारांनाही मतदान करता येणार आहे. ठाकरे सरकारला धक्का मानला जात आहे. आता लढाई सभागृहात होणार आहे. नबाब मलिका आणि अनिल देशमुख यांना मतदान करता येणार आहे.
शेवटची कॅबिनेट बैठक? काही चुका झाल्यास माफ करा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले आहे.
औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास मान्यता
औरंगाबाद शहराच्या "संभाजीनगर" नामकरणास तर उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव" नामकरणास मान्यता देण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
सिंघवींचा जोरदार युक्तीवाद
सर्वोच्च न्यायालयात एकपेक्षा जास्त तासापासून शिवसेनेचे वकील अभिषेक सिंघवी यांचा युक्तीवाद सुरु आहे. त्यांनी विश्वास दर्शक ठराव मांडण्याचा राज्यपालांच्या निर्देशला विरोध केला आहे.
काँग्रेसचे दोन मंत्री बैठकीला न जाताच बाहेर
मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसचे अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड बैठकीसाठी न जाताच बाहेर पडले. माध्यमांनी या मंंत्र्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.
आठ दिवसांच्या मुक्कामानंतर शिंदे गटाने गुवाहाटी सोडले
आठ दिवसांच्या मुक्कामानंतर शिंदे गटाने गुवाहाटी सोडले. दुपारी पाच वाजेच्या सुमारास त्यांंच्या गाड्यांचा ताफा विमानतळाकडे निघाले. ते गोव्याला जाणार असून उद्या मुंबईत दाखल होणार आहे.
फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन
सत्तानाट्यामध्ये आता प्रचंड वेगानं घडामोडी घडत असून राज्यापालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगितले आहे. यानुसार उद्या महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार यावर निर्णय होणार आहे. ठाकरे सरकारला पाडण्यासाठी भाजपने आता कंबर कसली असून प्रत्येक मतांसाठी गणित मांडत आहे. यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नागपुरात उद्धव समर्थकांची पदयात्रा
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि शिवसेना सोबतच मित्र पक्ष राष्ट्रवाद काँग्रेस आणि काँग्रेस याच सरकार अस्तिर झाल्याच चित्र आहे ..उद्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करायचं आहे तर दुसरी कडे शिवसैनिक मात्र आपण आजही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा बाजूनेच आहोत आणि सत्ता येत राहते जात राहते पण त्यांनी काही फरक पडत नाही अस म्हणत आज नागपूर मध्ये पदयात्रा काढत आंदोलन केले आहे.
एकनाथ शिंदे उद्याा बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाणार
शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार असल्याची घोषणा केली आहे. 30 जून रोजी परतल्यावर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आता शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक उद्या आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठक
राज्य मंत्रिमंडळ बैठक पाच वाजता आयोजित केली आहे. राज्यपालांचे अधिवेशन बोलवण्याचे आदेश, राज्यातील परिस्थिती, संभाजीनगरचे नामकरण यावर चर्चा होणार आहे.
मुंबईत तीन ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री आणि सचिव यांना बहुमत चाचणी सिद्ध करावी असे पत्र पाठवले होते... यानंतर विधिमंडळातून आता एक पत्रक जाहीर झाले आहेत त्यात सर्व आमदारांनी विधिमंडळात उद्या उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे... त्याचबरोबर बंडखोरी केलेले सर्व आमदार उद्या मुंबई येणार आहेत... या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.... मुंबईत तीन ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे...
मलिक , देशमुख सर्वोच्च न्यायालयात
सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला उपस्थित राहण्याची सर्वोच्य न्यायालयात परवानगी मागितली आहे. त्यावर संध्याकाळी सुनावणी होणार आहे.
बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्यात येणार
गोव्यातील हॉटेल ताज कॉनेवशन सेंटरमध्ये पोलिसाचा बंदोबस्त तैनात
संध्याकाळी बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्यात येणार असल्याने पोलीस अलर्ट.
आत्तापासूनच हॉटेलमध्ये येणाऱ्या सर्व वाहांनाची कसून तपासणी केली जात आहे.
मुंबईत उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीला सेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोवामार्गे येणार.
विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या
३० जून रोजी राज्याच्या विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केल्याचे पत्र विधानसभा सचिवालयाने काढले आहे. राज्यपालांच्या आदेशाने हे अधिवेशन बहुमत चाचणीसाठी असल्याचे पत्रात म्हटले आहे.
मातोश्रीवर खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, मंत्री सुभाष देसाई दाखल झालेले आहेत
बंडखोर आमदारांना खैरेंची धमकी
बंडखोर आमदारांना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी चांगलाच दम दिला आहे, यावेळी बंडखोर आमदारांनी सुद्धा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना मी आल्यानंतर पाहून घेईल अशी थेट धमकीच दिले आहे. यावेळी आता बंडखोर आमदार विरुद्ध शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्याचा संघर्ष सुरू झाला आहे.
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आमदार रवाना
शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रवाना. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा जयघोष करत मंदिराकडे रवाना झाले आहेत.
शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवणार
शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरु आहे. या आमदारांना मुंबई न सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यांची व्यवस्था पंचतारांकीत ट्रयडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे.
राज्यपाल आणि महाधिवक्ता यांच्यांत बैठक
राज्यपाल आणि महाधिवक्ता यांच्यांत बैठक झाली. अर्धा तास झालेल्या या बैठकीत शिवसेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेच्याा अर्जावर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेनेच्याा अर्जावर संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व पक्षांना आपली कागदपत्र सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
बंडखोर गट गोव्या मार्ग येणार
बंडखोर गटाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बंडखोर गट उद्या मुंबईत गोव्यामार्ग पोहचणार असल्याचे सांगण्यात आले.
गुलाबराव पाटील म्हणतात...
"कुछ लगता नहीं दुश्मनी बनाने में, उम्न बित जाती है दोस्ती निभाने में..."
गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला.
संजय राऊत यांनाही गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला. पानवाला कधी चुना लावून जाईल, कळणारही नाही.
शिवसेना सर्वोच्च न्यायालयात
राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहचली आहे. शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली असून थोड्याच वेळात त्यावर सुनावणी सुरु होणार आहे.
शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार
१६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. हे प्रकरण अजूनही कोर्टात असताना बहुमत चाचणीची आदेश का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत आहे. याप्रकरणी आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि न्यायाची मागणी करू, असंही राऊत म्हणाले आहेत.
“उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; एकनाथ शिंदेंची घोषणा
एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. शिंदे यांनी देवदर्शनानंतर आपण उद्या मुंबईत येऊन बहुमत चाचणीसाठी हजर राहणार असल्याची घोषणा केलीय. “उद्या मुंबईत येतोय, बहुमत चाचणीला हजर राहणार”; कामाख्या मंदिरातून एकनाथ शिंदें यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर सांगितले.
एकनाथ शिंदेंनी घेतले कामाख्या देवीचं दर्शन
गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे दर्शन शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतले.