जर्मनीतील मुलाने जिंकले मोदींचे मन, अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युरोप दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते जर्मनीची राजधानी बर्लिन (Berlin) येथे पोहोचले. बर्लिनमध्ये पोहोचल्यावर, डायस्पोरांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले आहे.
या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांची भेट घेऊन गप्पा मारल्या आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ शेअर (Video sharing) केला आहे. ज्यामध्ये ते एका मुलासोबत दिसत आहेत आणि मुलाला प्रोत्साहन देताना दिसून आले. मुलाने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी देशभक्तीपर गीत गायले, ज्याने त्यांचे मन जिंकले. मुलाने गायलेल्या गाण्याचे बोल होते, हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय हा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) शेअर केला आहे. या मुलाची देशभक्तीची एवढी सुंदर शैली पाहून मन आनंदित झाल्याचे अक्षयने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गाणाऱ्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करून मुलाच्या देशभक्तीचे कौतुकही केले आहे.
पीएम मोदींनी बराच वेळ मुलाशी संवाद साधला. मुलाने खूप काही सांगितले आणि पीएम मोदींनी त्याला प्रोत्साहन दिले. मुलाचे गाणे ऐकून पंतप्रधान मोदी खूप खुश झाले आहेत. मुलाकडून गाणे ऐकतानाचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. मुलाचे गाणे ऐकल्यानंतर पंतप्रधानांनी त्याचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनीही कु अँपवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, अद्भुत, आश्चर्यकारक! युरोपमध्ये या मुलाने सादर केलेल्या भारत मातेचा अभिमान, सर्वांची मने जिंकली.
यावेळी एका मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पेंटिंग दाखवली. वास्तविक या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्केच बनवले होते. तिने स्वत: पुढे येऊन हे स्केच पीएम मोदींना दाखवले. पीएम मोदींचा मुलीसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.