LIC IPO ग्रे मार्केट प्रिमियम आला अर्ध्यावर, वाचा तिसऱ्या दिवशी काय आहे परिस्थिती
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचा (Life Insurance Corporation of India (LIC) बहुचर्चित आयपीओची तारीख आली आहे. आता हा आयपीओ (IPO) 4 मे रोजी उघडला आहे. हा आता 9 मे रोजी तो बंद होईल. LIC IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम 50% कमी झाला आहे. आता हा प्रीमियम 85 वरुन 42 रुपयांवर आला आहे. मार्केटमधील बदलत्या परिस्थितीमुळे हा प्रिमयममध्ये घसरण झाली आहे.
पॉलिसीधारकांनी काय करावे?
पॉलिसीधारक आणि एलआयसी कर्मचाऱ्यांनी आरक्षित कोट्यातून बोली लावावी. कारण किरकोळ गुंतवणूकदारांच्या कोट्यातून शेअर अलॉटमेंट देताना सोडतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. परंतु राखीव कोट्यातून शेअर अलॉटमेंट हे आयपीओ बोली अर्जाच्या प्रमाणात देण्यात येणार आहेत.
पॉलिसीधारकांकडून प्रतिसाद
आयपीओमध्ये एलआयसी पॉलिसीधारकांसाठी 2.21 कोटी शेअर्स राखीवआहेत. आयपीओ खुला झाल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी 3.64 पट सबक्राईब झाला आहे. आतापपर्यंत 16.2 कोटी शेअरसाठी 19.87 कोटींची बोली लागली आहे.
आयपीओच्या आधारे एलआयसीचे मूल्यांकन रुपये सहा लाख कोटी होते. एलआयसी आयपीओतून केंद्र 63 हजार कोटी ते 65 हजार कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. एलआयसी आयपीओचा विस्तार सरकार 31.62 कोटींवरून 38 कोटी शेअर्सपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
एलआयसीचा इश्यू आणण्यासाठी सरकारने सेबीकडून घेतलेल्या मंजुरीनुसार १२ मेपर्यंत वेळ आहे. LIC चा IPO 12 मे पर्यंत येऊ शकला नाही, तर सरकारला पुन्हा SEBI कडे अर्ज सादर करावा लागेल. LIC चा IPO ही भारतीय शेअर बाजाराची सर्वात मोठी समस्या असेल. याच्या मदतीने सरकार 2023 या आर्थिक वर्षात 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य गाठू शकते.