नांदेडच्या सभेतून लक्ष्मण हाके यांनी साधला आमदार, खासदारांवर निशाणा; म्हणाले...

नांदेडच्या सभेतून लक्ष्मण हाके यांनी साधला आमदार, खासदारांवर निशाणा; म्हणाले...

नांदेडच्या सभेतून लक्ष्मण हाके यांनी आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कमलाकर बिरादार, नांदेड

नांदेडच्या सभेतून लक्ष्मण हाके यांनी आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडमधील हदगाव येथे लक्ष्मण हाके यांची सभा झाली. या सभेनंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसीचा खरा शत्रू ब्राम्हण नाही. ओबीसींचा खरा शत्रू महाराष्ट्र लाटणारा आमदार, खासदार, कारखानदाऱ्या दरोडेखोरांची टोळी आहे. ब्राम्हण आज शिक्षणाच्या जोरावर देशातल्या प्रत्येक प्रगत देशामध्ये गेला. तो येथ भांडत बसला नाही.

मागासवर्गीयांना अधिकार देणारे ब्राम्हण होते. पण आजचा जो महाराष्ट्र बघायला मिळतो आहे. तो हा फक्त काही ठराविक लोकांचा, वतनदारांचा, दरोडेखोरांचा महाराष्ट्र बघायला मिळत आहे. असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com