laxman hake on manoj jarange
laxman hake on manoj jarange

"राजकीय उलथापालथ तर सोडाच जरांगे एक ही सीट उभी करू शकत नाही", हाकेंची टीका

लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

लातूर जिल्ह्यातल्या औसा येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. दसरा मेळाव्याला जरांगेंच्या हस्तकांनी पैसा पुरावला असून "राजकीय उलथापालथ तर सोडाच जरांगे एक ही सीट उभी करू शकत नाही. त्यांची तेवढी हैसियत नाही", असे म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगेच्या पत्येक कार्यक्रमासाठी शरद पवार रसद पुरवतात. तर रोहित पाटील यांच्या वॉर रूममधून त्यांचे कार्यक्रम ठरवले जातात. त्यांची रसद शरद पवार, खासदार काळे, खासदार भुमरे हे पुरवत असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केला आहे. यासोबतच "जरांगे यांना अक्कल नाही ते कोणाच्या सल्ल्याने चालतात?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. "आम्ही कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे हे ठरवले आहे" असे देखील लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com