लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा नववा दिवस; राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीत जाणार

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा नववा दिवस; राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीत जाणार

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीत जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळही लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

सकाळी साडेनऊ वाजता शिष्टमंडळ भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com