Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई गॅंगविरुद्ध भारतात कारवाई, बिश्नोई गॅंगचे ७ शूटर्स ताब्यात

Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई गॅंगविरुद्ध भारतात कारवाई, बिश्नोई गॅंगचे ७ शूटर्स ताब्यात

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी बिश्नोई गॅंगवर कारवाई, शस्त्रांसह शूटर्स ताब्यात.
Published by :
Team Lokshahi
Published on

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आलं आहे. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान या गँगचे प्रमुख लक्ष्य असल्याचे पाहायला मिळत आहे. बाबा सिद्दिकी हे सलमान खान यांच्या जवळचे आणि जिवलग मित्र असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली आणि याची कुबूली लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून करण्यात आली आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध संपूर्ण भारतातील कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक करण्यात आली आहे. सर्व शूटर्सना पंजाब आणि इतर राज्यांतून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांकडून शस्त्रेही जप्त केली आहेत. याआधी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ने देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीवर कारवाई केली होती. एनआयएने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई उर्फ ​​भानू हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. गायक-राजकारणी सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही तो आरोपी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com