ताज्या बातम्या
2000च्या नोटा बदलण्याची आज शेवटची संधी, नाहीतर...,RBIने सांगितले
मे महिन्यात सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.
मे महिन्यात सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली.
नोटा बदलून देण्याची किंवा जमा करण्याची प्रक्रिया 23 मेपासून बँकांकडून सुरू करण्यात आली होती. केवायसी नियम आणि इतर कायदेशीर प्रक्रियांद्वारे लोक बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलू शकतात.
2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे. 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची अंतिम मुदत वाढवणार नाही. असे रिझर्व्ह बँकेने सांगितल्याची माहिती मिळत आहे.