Janmashtami : हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की... कृष्ण जन्मोत्सवाचा उत्साह
हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की म्हणत मध्यरात्री 12 च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सूर्योदयापासून उपवास सुरू केला जातो, पूजा केल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर हा उपवास सोडला जातो.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा नगरीत देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात कंसाच्या कैदेत झाला. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हा उत्सव साजरा केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाता हिंदू धर्मात विशेष महत्त्व हे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे.
गोकुळ मथुरा वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. गुजराथमध्ये सातम म्हणजे सप्तमीच्या दिवशी विविध पद्धतीचे खेळ खेळले जातात आणि रात्री बारा वाजता कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात.