कोकण विभागाने पटकाविले एकूण 53 पैकी 20 पुरस्कार
पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार” या कार्यक्रमात राज्यातील एकूण 53 उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात 53 पैकी 20 पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ठाणे-6 (मे. अपर इंडस्ट्रिज लि., मे. कनेक्टवेल इंडस्ट्रिज प्रा.लि., मे.ज्योती स्टील इंडस्ट्रिज, मे. कविश फॅशन प्रा.लि., मे. सचिन्स इम्पेक्स, मे. दलाल प्लास्टिक प्रा.लि.)
रत्नागिरी-6 (मे. जिलानी मरीन प्रोडक्ट, मे. कृष्णा ॲन्टी ऑक्सिडन्टस प्रा.लि., मे. अल्काय केमिकल्स प्रा.लि., मे. गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा.लि., मे. एम.के.ए. इंजिनियर्स ॲण्ड एक्स्पोर्टर्स प्रा.लि., मे. सुप्रिया लाईफ सायन्स लि.घटकाला दोन प्रवर्गात एकूण ८ सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाले असून सुप्रिया लाईफसायन्सने महाराष्ट्रामध्ये अवल स्थान पटकावले आहे.
रायगड-4 (मे.नाईक ओशियन एक्सपोर्टस प्रा.लि., मे. कपूर ग्लास इंडिया प्रा.लि., मे. गंधार ऑईल रिफायनरी (इंडिया) लि., मे. एचकेएस इम्पेक्स, प्रा.लि.)
पालघर-3 (मे. खोसला प्रोफिल प्रा.लि., मे. बिक केमिकल्स ॲण्ड पॅकेजिंग प्रा.लि., मे. ईस्टमन केमिकल)
सिंधुदूर्ग-1 ( मे. अमृता कॅश्यू इंडस्ट्रिज) असे मिळून एकूण 20 निर्यात पुरस्कार मिळाले.
या कार्यक्रमा दरम्यान निर्यातदार उद्योजकांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. ज्यामध्ये कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या नऊ उद्योजकांनी सहभाग घेतला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सहसंचालक शैलेश रजपूत, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्र ठाणे,पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग च्या महाव्यवस्थापक सीमा पवार, श्री उपेंद्र सांगळे, श्री हणबर, श्री. हरल्या, श्री. दामले आदी मान्यवर उपस्थित होते.