Kolhapur: कोल्हापुरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर शिवसेना युबीटी आक्रमक
कोल्हापुरात उद्या घरगुती गौरा-गणपतीचं विसर्जन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पंचगंगा घाटावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं बॅरिगेटींग करण्यात आलेलं आहे. हे बॅरिगेटींग कोणताही गणपती आत विसर्जन केला जाऊ नये यासाठी करण्यात आलेले आहेत. रस्ते खराब असल्यामुळे बाप्पाचं आगमन हे खराब रस्त्यांवरून झाले आता त्यांचे विसर्जन ही याच खडकाळ रस्त्यांवरून करायचं का? असा प्रश्न करतं कोल्हापुरातील शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील पुकारलेले आहे.
यावर शिवसेना युबीटी कार्यकर्ता म्हाणाले की, गणपती हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा सण आहे. बाप्पाचं आगमन झालं ते देखील खड्यांमध्ये आता विसर्जनाकरीता कोल्हापुरात एक तरी रस्ता प्रशानसाने दाखवावा असा प्रश्न शिवसेना युबीटी कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पुढे ते म्हणाले, अनेक वर्ष शिवसेना रस्त्यावर उतरून निवेदन करून लोकशाही मार्गाने चालून कंटाळलं आता परंतू हे मुडदार प्रशासन काही लक्ष द्यायला तयार नाही आहे. ठेकेदार आणि सत्तादारी यांच्या घट्टसाखळीमुळे दर्जेदार कामचं होत नाही आहे. याला जबाबदारी कोण असतील तर ते संबंधीत अधिकारी ज्यांनी दुर्लक्ष केलं ते. आमचा प्रशानसाला एकचं प्रश्न आहे तुम्ही तुमचा जबाबदारी घेणार आहे की नाही? की तुम्हाला खुर्ची महत्त्वाची आहे असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला.