ताज्या बातम्या
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटांवर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
सतेज औंधकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटांवर गेली आहे. कोल्हापूरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 33 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची मोठी आवक झाली असून पश्चिम घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
जोरदार पावसामुळे राधानगरी धरण 50 टक्के भरले असल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडीवरून वाहू लागल्या आहेत. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.