Kolhapur North By Election Result
Kolhapur North By Election ResultTeam Lokshahi

जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव

कोल्हापुरच्या जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली.
Published by :
Sudhir Kakde
Published on

कोल्हापुर : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीचे निकाल (Kolhapur North By Election Result) अखेर आज जाहीर झालेत. भाजपाचा धुव्वा उडवत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र या निवडणुकीत किंगमेकर ठरले बंटी उर्फ सतेज पाटील. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या प्रतिष्ठेला मात्र या निकालामुळे धक्का लागला आहे. दोन पाटलांची प्रतिष्ठा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती, मात्र कोल्हापुरच्या जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली.

Kolhapur North By Election Result
जितेंद्र आव्हाडांच खोचक मीम; चंद्रकांत पाटलांना हाणला टोला

दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोट निवडणूक घ्यावी लागली. रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघडीकनं चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देत निवडणूकीच्या आखड्यात उतरवलं. तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी देत मैदानात उतरवलं. प्रतिष्ठा मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे नेते गृहराज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांची पणाला लागली होती.

कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पाटलांनी प्रचाराचा अक्षरशः रान उठवलं. एका मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे दिग्गज नेते प्रचारासाठी कोल्हापूर उत्तरच्या रस्त्यांवर उतरले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी धडाक्यात प्रचार केला. भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर राज्य पातळीवरच्या नेत्यांनी केलेल्या प्रचारामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली.

Kolhapur North By Election Result
भाजप आमदार गणेश नाईकांवर अखेर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण काय ?

दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तरच्या जनतेने योग्य उत्तर देत महाविकास आघाडीच्या जयश्री पाटील यांना विजयी केलं. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या जरी विजयी ठरल्या असल्या तरी कींगमेकर हे बंटी उर्फ सतेज पाटील हे ठरल्याचं बोललं जातंय. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील विरुद्ध भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली.

संपूर्ण राज्याचं लक्ष कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीकडे लागलं होतं. त्यामुळे याठिकाणी कोण बाजी मारणार ही चर्चा सगळीकडे होते, मात्र भाजपाला धोबीपछाड देत कोल्हापूरच्या जनतेने चोख उत्तर देत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com