कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा

कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा

कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोल्हापुरात जैन समाजाचा विराट मूक मोर्चा काढण्यात आला आहे. सम्मेद शिखरजी पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निषेधार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्मियांच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण होत आहेत या ठिकाणी काही निंदनीय प्रकार घडत आहेत, या सर्वांचा प्रतिबंध करावा यासाठी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहून जैन धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला तीर्थक्षेत्र दर्जा राहावे यासाठी, अशी मागणी केली आहे.जैन धर्मियांच्या सर्व तीर्थक्षेत्रांना संरक्षण तसेच तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही तोपर्यंत जैन समाज धर्मात आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.मोर्चानंतर केंद्र सरकारने जर मागणी मान्य केले नाही, तर टप्प्याटप्प्याने मुंबई येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोर्चाने जाऊन निवेदन देण्यात येईल.असे सांगण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com