Kokan Railway
Kokan RailwayTeam Lokshahi

कोकण रेल्वे वेळापत्रकात १ नोव्हेंबरपासून बदल

सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर बदल केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कोकण रेल्वे धावत आहे. मात्र, आता कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

लक्ष्मीकांत घोणसेपाटील, रत्नागिरी

पावसळ्यासाठी कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर बदल केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कोकण रेल्वे धावत आहे. मात्र, आता कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार आहे.

Kokan Railway
चिपळूणच्या सुकन्या माजी खासदार सुमित्राताई महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल होणार?

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात झालेले बदल:

  • कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे .

  • १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून

  • १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे .

  • सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या .

  • हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे .

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com