IPL 2024 : आता चेन्नई सुपर किंग्जसाठी खतरा! RCB ला 'प्ले ऑफ'मध्ये पोहचवणार '18'; जाणून घ्या या नंबरचं खास कनेक्शन
RCB Number 18 Connection : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल २०२४ मध्ये ज्या प्रकारे वापसी केली आहे, ते पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरसीबी आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या स्थितीत होती. परंतु, आता फक्त एक सामन्यातील विजय आरसीबीला प्ले ऑफचं तिकिट देऊ शकतं. आरसीबीला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करावा लागेल. हा सामना १८ मे ला खेळवला जाणार आहे. अशातच आरसीबी आणि विराट कोहलीच्या १८ नंबरचं असं कनेक्शन समोर आलं आहे की, चेन्नईला हा सामना जिंकणं सोपं जाणार नाही.
आयपीएलच्या गुणतालिकेत आरसीबीचा संघ यावेळी सहाव्या स्थानावर आहे. आरसीबीचे १३ सामन्यांमध्ये १२ गुण आहेत. आरसीबीला त्यांचा पुढील सामना सीएसकेविरोधात खेळायचा आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या संघाला टॉप-४ मध्ये जाणं शक्य होईल. सीएसकेचे १४ गुण आहेत आणि आरसीबीचे १२ गुण आहेत. जर आरसीबीने सीएसकेचा पराभव केला, तर त्यांचेही १४ गुण होतील. त्यावेळी दोन्ही संघांचा नेट रन रेट पाहिला जाईल. आरसीबीचा नेट रनरेट खूप चांगला आहे.
आरसीबीचा १८ मे साठी आहे खास कनेक्शन
आरसीबी आणि सीएसके यांच्यात होणारा सामना एक क्वार्टरफायनल सारखा मानला जात आहे. जो संघ या सामन्यात जिंकेल, त्याला प्ले ऑफ मध्ये जागा मिळणार आहे. हा सामना १८ मे ला आहे आणि या नंबरचं खास कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आरसीबीच्या विजयाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरसीबीचा नंबर १८ शी काय कनेक्शन आहे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.
१) आरसीबी आणि सीएसकेचा सामना १८ मे ला आहे आणि हा सामना नॉकआऊटसारखा आहे.
२) आरसीबीला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी सीएसकेला रन चेज करून १८.१ षटकात पराभव करावा लागेल. जर संघाने प्रथम फलंदाजी केली, तर त्यांना १८ धावांनी विजय मिळवावा लागेल.
३) दिल्ली कॅपिटल्सने १८ धावांनीच लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला आणि त्यामुळेच आरसीबीचा प्ले ऑफचा मार्ग मोकळा झाला.
४) आरसीबी कधीही १८ मे ला हरली नाहीय.
५) विराट कोहलीने १८ मे ला दोन शतक ठोकले आहेत.