शेतकरी प्रश्नांवरुन पुन्हा एकदा किसान सभा आक्रमक; मंत्री विखेंच्या कार्यालयावर धडकणार मोर्चा
शेतकरी पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते लोणी असे चालणार आहेत.अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदतीचा एक रुपया देखील मिळाला नसल्याचे डॉ. अजित नवले म्हणाले. सरकार येऊन नऊ महिने उलटले तरी काहीच होत नाही. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.
याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा किसान सभेने एल्गार पुकारला आहे. किसान सभेच्या वतीने पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा 26 एप्रिल ते 28 एप्रिलपर्यंत चालणार आहे. डॉ. अजित नवले यांनी सांगितले की, राज्यभरातील सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांसोबत पायी मोर्चात सहभागी होणार आहेत.
हा मोर्चा तीन दिवस पायी चालून, महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर हा भव्य राज्यव्यापी पायी मोर्चा काढण्यात येत आहे.