सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही; आंदोलकांचा बैठकीस जाण्यास नकार
शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना यांनी हा लाँग मार्च काढला आहे.
काल(14 मार्च) दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार होती मात्र ती पुढे ढकलली आहे. आणि आज (15 मार्चला) 3 वाजता बैठक होणार आहे. अशी माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता माजी आमदार जे पी गावित यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, मोर्चा घेऊन मुंबईत जाणार मात्र चर्चेसाठी मंत्र्यांनी यावेमोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत जाणार नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सबंधित मंत्र्यांनी मोर्च्याच्या ठिकाणी यावं. तसेच सरकार सन्मानाने वागणूक देत नाही, आम्ही चर्चेसाठी जाणार नाही, सामान्य माणूस सरकारला झुकावू शकतो हे आम्ही दाखवून देणार असे आता माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितले आहे.