Kirit Somaiya on Sanjay Raut: “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार"
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. सकाळीच ईडीची टीम राऊत यांच्या घरी दाखल झाली. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ईडीचं हे पथक संजय राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती आहे. जवळपास 10-12 अधिकारी त्यांच्या घरी असल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, शोधमोहिम आणि चौकशी सुरू असून, संजय राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा असून कोणालाही आत जाण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. यातच आता यासंदर्भात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार, सगळा हिशोब द्यावा लागणार, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे
किरिट सोमय्या ट्विट करत म्हणाले की, संजय राऊत यांची जागा नवाब मलिक यांच्या शेजारीच असावी, अशी राज्यातील साडेबारा कोटी जनतेची इच्छा आहे. तसेच राऊत हे परदेशात कुटुंबासह फिरायला जात होते. त्याचा पैसा आला कुठून? त्यांचे हॉटेलचे बिल कोण देत होते? असा सवाल करतानाच राऊतांना हिशोब तर द्यावाच लागणार, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे