Kirit Somaiya
Kirit Somaiya team lokshahi

उद्या ठाकरे परिवाराचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार

मुंबई येथील पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या बोलत होते
Published by :
Vikrant Shinde
Published on

मागील काही दिवस भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) नॉट रीचेबल असल्याचं वृत्त समोर येत होतं. मात्र माध्यमांसमोर येताच किरीट सोमय्या ह्यांनी आपल्यावर INS Vikrant संदर्भात केले गेलेले आरोप हे खोटे व बिनबूडाचे असून राऊतांकडे माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही असंही ते म्हणाले.

सोमय्यांची पत्रकार परिषद:

आज (14-04-2022) किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर (MVA Goverment) विशेषत: शिवसेनेवर (Shivsena) टीकास्त्र सोडले आहे. बोलताना ते म्हणाले, 'आमचा न्याय व्यवस्थेवर पुर्ण विश्वास आहे. आज आंबेडकरांचा स्मृतीदिवस आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा पुर्ण विश्वास आहे.'

जे आम्ही बोललो तेच न्यायालयाचंही मत:

जे आम्ही बोललो तेच न्यायालयही म्हणालं, 58 कोटींचा आकडा आला कुठून हाच सवाल न्यायालयानेही उपस्थित केला. एकेदिवशी शिवसेनेकडून माझ्यावर 58 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातो आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाला. पुरावे मात्र कूठेच नाहीत. मागच्या 3 महिन्यात त्यांनी 10 वेळा अशी नौटंकी केली आहे.

उद्या आणखी एक घोटाळा जनतेसमोर आणणार:

ठाकरे सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. त्यांनी अनेक घोटाळे केले आहेत. त्या घोटाळ्यांपैकीच ठाकरे परिवारातील आणखी एक घोटाळा मी उद्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार आहे. हा माझा महाराष्ट्राच्या जनतेला शब्द आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com