मेट्रोचा विषय घेऊन सोमय्या पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर फक्त 'ठाकरे'

मेट्रोचा विषय घेऊन सोमय्या पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर फक्त 'ठाकरे'

ठाकरे सरकारमुळे मुंबई मेट्रोची 10,000 कोटी रुपये किंमत वाढणार... याची भरपाई कोण करणार असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन
Published by :
Sudhir Kakde
Published on

राज्यात सुरु असलेल्या सत्ता संघर्षादरम्यान, शिवसेनेचे (shivsena) चाळीस आमदार फुटले आणि भाजपसोबत (BJP) गेले. भाजपसोबत जात शिवसेनेतील शिंदे (CM Eknath Shinde) गटाने सत्तास्थापन केली अन् मुख्यमंत्री पदही मिळवलं. या सर्व घडामोडींदरम्यान, नेहमीच शिवसेनेवर तुटून पडणारे किरीट सोमय्या मात्र शांत होते. आता सत्तास्थापन झाल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. सोमय्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकारमुळे मुंबई मेट्रोची 10,000 कोटी रुपये किंमत वाढणार... याची भरपाई कोण करणार असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचा अहंकार व स्वार्थ यामुळे मुंबईची मेट्रो रखडली, आरे कारशेड चे काम बंद पडले कारशेडसाठी आणखी कोणतीही जागा ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार उपलब्ध करू शकले नाही, यामुळे अनेक समस्या उद्भवल्या, मुंबईची मेट्रो रखडली. याला जबाबदार उद्धव ठाकरे हेच आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

मेट्रोचा विषय घेऊन सोमय्या पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर फक्त 'ठाकरे'
शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबद्दल उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले कायद्याने...

कांजुरमार्ग येथील जागा कारशेड साठी उपलब्ध होऊ शकणार नाही हे श्रीमान उद्धव ठाकरे यांना माहित होतं. ठाकरेंनी नेमलेल्या मनोज सौनिक समितीने आपल्या अहवालात स्पष्टपणे सांगितलं होतं की, कांजुरमार्गची जागा सहजासहजी उपलब्ध होणार नाही. न्यायालयाने स्थगिती दिली आहे. येथे कांजुरमार्ग ला कारशेड हलवण्याचा निर्णय घेतला तर मेट्रो ४ वर्षे मागे जाणार त्यामुळे किमत ही प्रचंड वाढणार, असे अधिकाऱ्यांनी व तज्ञांनी सांगितलेले असताना स्वार्थामुळे आरे कारशेड ची जागा बदलण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. आरे कारशेडच्या ऐवजी दोन पर्यायी जागेवर ठाकरे सरकारने चर्चा केली त्यातील एक जागा म्हणजे कांजुर कारशेड ज्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती.

मेट्रोचा विषय घेऊन सोमय्या पुन्हा मैदानात; आता निशाण्यावर फक्त 'ठाकरे'
Sanjay Raut : "...तर अख्खा महाराष्ट्र आमच्या पकडीत येईल"

दुसरी जागा म्हणजे रॉयल पाम खाजगी बिल्डर यांची जागा या जागेवर कारशेड हलवण्यात आले तर रॉयल पामच्या मालकाला रु. 4,800 कोटींचा TDR मिळणार या विषयावर आंदोलन करणाऱ्या वनशक्ती या सामाजिक संस्थेने ही जागा कारशेडसाठी लिखीत स्वरुपात सुचवली होती. खरं म्हणजे 2017-2018 मध्ये या विषयावर आंदोलन करणाऱ्या लोकांचा संदर्भात त्यावेळेच्या मुंबई मेट्रो रेलवे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी तक्रार ही नोंदविली होती. बी. के. सी. पोलीस स्टेशन यांनी या संबंधात तपास केल्या नंतर बंगलोरच्या एक्सोटेल टेककॉम प्रा.लि. यांना यासंदर्भात अपप्रचार करण्यासाठी डिजीटल मिडिया व सोशल मिडियाचा उपयोग करण्यासाठी सांगण्यात आले होते. यासाठी एक्सोटेल टेककॉम या कंपनीला अमेरिकेहून पैसे ही आले होते. यासंदर्भात पोलीस तपास चालू असताना ठाकरे सरकारने हा तपास थांबवण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात याची सी समरी बंद करण्याचा अहवाल ही सुपूर्त करण्यात आला होता. अजूनपर्यंत न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला नाही.

किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब हा तपास पुढे न्यावा. हा तपास बंद करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करावा व मुंबईची मेट्रो रुळावरून खाली आणण्याचे जे षड्यंत्र होते त्याची चौकशी करण्यात यावी. एक्सोटेल टेककॉम च्या मागे कोण याचा तपास व्हावा अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कारशेड पुन्हा आरे येथे हलविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही स्वागत करतो आणि मुंबईची मेट्रो लवकरच रुळावर येऊन लाखो प्रवास्यांचा प्रवास सुखकर होवो अशी प्रार्थना करतो..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com