ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून किंग चार्ल्स तृतीय यांनी केली ऋषी सुनक यांची नियुक्ती
भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनक हे काल ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहे. किंग चार्ल्स तृतीय यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नवे नेते ऋषी सुनक यांची नियुक्ती केली आहे. आज मंगळवारी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स तृतीय यांची ऋषी सुनक यांनी भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करत आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले.
किंग चार्ल्स यांच्या भेटीनंतर ऋषी सुनक म्हणाले की, चुका सुधारण्यासाठी माझी निवड करण्यात आली आहे. मी नम्रतेने ब्रिटनच्या लोकांची सेवा करेल असे वचन देतो. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो. आपण सर्व मिळून चांगले भविष्य घडवू. असे सुनक म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, हे सरकार प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि प्रत्येक स्तरावर जबाबदारीचे असेल. मी तुमचा विश्वास कमावला आहे आणि तो मी कायम राखीन. ब्रिटन हा महान देश आहे, पण देशासमोर गंभीर आर्थिक आव्हान आहेत, यात शंका नाही. पुढे कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. सध्या आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.