Lokshahi Impact : पुण्यातील किडनी तस्करी; आरोग्य मंत्र्यांचे महासंचालकांना चौकशीचे आदेश
मुंबई|सुमेध साळवे
पुण्यातील किडनी तस्करी रॅकेटच (Kidney Swapping Racket) पर्दाफाश लोकशाही न्युजने केला होता. याप्रकरणी आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चौकशीचं आश्वासन दिलं असून, या प्रकरणात सहभागी असलेल्या दोषींना शोधण्याचं काम सुरु झालं असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. रुबी हॉल क्लिनीकमध्ये हा प्रकार घडला होता. एका महिलेची बनावट नावाने किडनी ट्रान्सप्लान्ट करण्यात आली होतं. पैसे न मिळाल्यानं रुग्ण महिलेले रॅकेटच्या जाळ्यात फसल्याचा संशय आला होता. त्यानंतर हा सर्व प्रकार लोकशाही न्युजने उघडकीस आणला.
राजेश टोपे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, पुण्यात एका महिलेने स्वत:ची किडणी विकण्यासाठी १५ लाख रुपये घेतले होते. मात्र ट्रान्सप्लान्टसाठी रक्ताचं नातं लागतं. त्यामुळे एका पुरूषाने हा सर्व प्रकार कायद्यात बसवण्यासाठी खोटे दस्तावेज करून, बायको म्हणून नातं दाखवण्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड बनवले. तसंच बायको नवऱ्याला किडणी देतेय हे सांगून ही शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं आहे असं राजेश टोपेंनी सांगितलं.
या प्रकरणात सहभागी असलेल्या एजंटचा बिमोड करू, मुळापर्यंत जाण्यासाठी तसंच केस विक होऊ नये यासाठी आपण स्वत: पुण्याचे आय़ुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी मी स्वत: चर्चा केली असल्याचं राजेश टोपे यांनी दिलेलं आहे.