खारघर पोलिसांची धडक कारवाई; सिने स्टाईल नायजेरियन ड्रग्स विक्रेते पकडले

खारघर पोलिसांची धडक कारवाई; सिने स्टाईल नायजेरियन ड्रग्स विक्रेते पकडले

खारघर मध्ये अनेक वर्ष ड्रग्स विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विकास मिरगणे, नवी मुंबई

खारघर मध्ये अनेक वर्ष ड्रग्स विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. त्याला आला घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून 25 जुलैला रात्री 11 वाजता एका संशयित घरावर धाड टाकली असता त्या ठिकाणी चार नायेजेरियन व्यक्ती आढळून आल्या,त्यात एका महिलेचा समावेश होता. त्यातील एका नायजेरियन व्यक्तींचे पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता,खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी त्याला सिने स्टाईल पकडुन ताब्यात घेतले.

हा प्रकार जवळपास दोन तास सुरू होता. अनेकवेळा पकडण्याच्या प्रयत्न केला असता त्याने पोलिसांनाच प्रतिकार केला. मात्र पोलिसांनी बेधडकपणे या चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा विनापरवाना देशात प्रवेश,अमली पदार्थ बाळगणे या प्रकरणी विविध गुन्हे दाखल केले असून त्यांच्या कडून 1 कोटी 30 लाखांचे मेथॉक्युलन ड्रग आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

या कारवाईने अवैध्य ड्रग्स व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र खारघर परिसरात नायजेरियन व्यक्ती कडून अनेक वर्ष ड्रग्स विक्रीचे धंदे राजरोसपणे सुरू असतात,याला अनेकजण बळी पडतात,ज्यात कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश असतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com