Ketaki Chitale
Ketaki ChitaleTeam Lokshahi

केतकी चितळे नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात करणार चौकशी

Published by :
Sudhir Kakde
Published on

ठाणे | निकेश शार्दुल : मराठी अभिनेत्री आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट करुन वादात सापडणारी मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitale) अडचणीत सध्या चांगलीच वाढ झाली आहे. त्यातच आता तिचा ताबा रबाळे पोलिसांनी (New Mumbai Police) घेतला आहे. बौद्ध धर्मासंदर्भात केलेल्या एका आक्षेपार्ह पोस्टमुळे केतकीवर अ‍ॅट्रॉसिचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ketaki Chitale
Sandeep Deshpande, Santosh Dhuri यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

काय होती पोस्ट?

केतकीनं 1 मार्च 2020 रोजी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिनं अनेक धर्मांचा उल्लेख केला आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क', आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो." नवबौद्धांसंदर्भातल्या वाक्यावर आक्षेप घेत स्वप्निल गोविंद जगताप यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

Ketaki Chitale
शरद पवारांबद्दल वादग्रस्त ट्विट; निखिल भामरे या तरुणाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

केतकीनं असंही लिहिलं होतं की, "ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की 'मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू असंही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय. मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे" असंही केतकीनं तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com