Nana Patole
Nana PatoleTeam Lokshahi

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं आकडेवारीवरून कळत आहे. यावर आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले नाना पटोले?

“सध्या बॅलेटमध्ये सुशिक्षितांचं मतदान आहे. परिवर्तन सुरू होत आहे. यावेळी जवळपास ४५ टक्के मतदान काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल. मागच्यावेळी काँग्रेसला जनतेने कौल दिला आणि त्याचाच फायदा घेऊन मोदी सरकारने जनतेच्या कौलाविरोधात जाऊन सरकार स्थापन केलं. भाजपा लोकशाही न मानणारा पक्ष आहे. त्यामुळे यंदा जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिलं आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

लिंगायत समाजाला वाळीत टाकण्याचं काम भाजपाने केलं

मागच्या वर्षी सुद्वा आम्हाला काठावर बहुमत दिल होत. भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचारी भाजप हे जनतेच्या समोर आलं. लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले आणि त्यांना वाळीत टाकण्याच काम भाजपने केल. त्यामुळे त्यांना तिथल्या जनतेने वाळीत टाकले. कर्नाटकात 124 च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत. याहुनही जास्त जागा येतील . राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांच लोकसभेच सदस्यत्व रद्द करण्याच पाप भाजपन केल त्यांना बेघर केल.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही. असं नाना पटोले यांनी सांगितलं.

Nana Patole
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकमध्ये सुरुवातीच्या कलात काँग्रेसला बहुमत, 115 जागांनी आघाडीवर

राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशात मान्यता सुरु

“राहुल गांधींच्या नेतृत्वात कर्नाटक निवडणुकीचा सर्व प्रचार करण्यात आला. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशात मान्यता सुरु झाली आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होती. मला ९१ शिव्या दिल्या, असं पंतप्रधानांनी सांगितलं. त्यावर ‘आमच्यावरील शिव्याचं पुस्तक निघेल,’ राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी म्हटलं. त्यानंतर पंतप्रधान नाउत्तर झाले,” असं नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com