ताज्या बातम्या
Karnataka Election Result 2023 LIVE : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती मोठा धक्का; सर्वच उमेदवार पराभूत
Karnataka Assembly Election Results 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
कर्नाटक निवडणुकीत बेळगावमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व उमेदवार पराभूत
कर्नाटक निवडणुकीत बेळगामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला आहे. समितीला सर्वच जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 मतदारसंघांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असून 7 जागांवर भाजपची सरशी झाली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुरलीधर पाटील (खानापूर), रमाकांत कोंडूसकर (बेळगाव दक्षिण), अमर येळ्ळूरकर (बेळगाव उत्तर) आणि आर. एम. चौगुले यांना बेळगाव ग्रामीणमधून पराभव स्वीकारावा लागला आहे.
Big Breaking | मुख्यमंत्री बसवराज बोम्मई विजयी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या शिग्गांव मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सलग तीन वेळा विजयी झालेले बोम्मई आता चौथ्यांदा याठिकाणाहून आमदार म्हणून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पठाण यासिर अहमद खान यांचा पराभव केला आहे.