महाराष्ट्रातून तातडीने कर्नाटकात पाणी सोडा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला. सिद्धरामय्या मुख्यमंत्री तर शिवकुमार उपमुख्यमंत्री झाले. त्यांचा शपथविधीही पार पडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक विनंती केली आहे. यांची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
कर्नाटक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणावर भीषण परिस्थिती आहे. कर्नाटक सरकारच्या विनंतीनंतर महाराष्ट्र सरकारने वारणा-कोयना पाणीसाठ्यातून कर्नाटकसाठी १ टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडलं होतं. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्र सरकारकडे कर्नाटकात तातडीने आपल्या पाणीसाठ्यातून पाणी सोडण्याची विनंती केली आहे.वारणा-कोयना पाणीसाठ्यातून २ टीएमसी तर उजनी पाणीसाठ्यातून भीमा नदीत ३ टीएमसी पाणीसाठा सोडावा अशी त्यांनी विनंती केली आहे.