Kanpur Violence
Kanpur ViolenceTeam Lokshahi

"पुन्हा बुल्डोझर चालवला तर कफन बांधून..."; कानपूरमध्ये मुस्लिम आक्रमक

काझी हाजी अब्दुल कुद्दूस यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बोललं जातंय.
Published by :
Sudhir Kakde
Published on

कानपूरमधील हिंसाचारानंतर पोलिसांची कारवाई सुरू असून आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील काझी हाजी अब्दुल कुद्दूस यांनी वादग्रस्त वक्तव्य करून पोलिसांवर एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचं कुद्दुस यांनी सांगितलं. एवढंच नाही तर अशी कारवाई करून बुल्डोझर चालवण्यासारखी कारवाई झाल्यास लोक कफन बांधून मैदानात येतील, असंही ते म्हणाले. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांपैकी 90 ते 95 टक्के मुस्लिम आहेत. या प्रकरणात एकट्या मुस्लिमांचा दोष नाही, असंही ते म्हणाले. या लोकांची चूक एवढीच होती की, त्यांनी मिरवणूक काढून बाजार बंद केला. मिरवणुकीत त्यांच्यावर दगडफेक करण्यात आल्याचं मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितलं.

मुस्लिमांवर दगडफेक होत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. बुल्डोझर चालवण्यासारखी कारवाई झाल्यास लोक कफन बांधून मैदानात येतील, असं काझी हाजी म्हणाले. असंच होत राहिल्यास आपण मरण्यासाठी तयार आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार म्हणाले की, पोलिस लवकरच या संदर्भात एक नवीन पोस्टर जारी करतील. यामध्ये आणखी काही आरोपींची छायाचित्रं असतील. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांनाच शिक्षा होईल, असंही ते म्हणाले. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणत्याही निर्दोष लोकांवर कारवाई होणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com