'हा' घाट आजपासून बंद, 'हे' आहेत तीन पर्यायी मार्ग
कन्नड घाटातील वाहतूक कोंडीवर औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे.जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट हा 11 ऑगस्टपासून काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश दिले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याला जोडणारा औट्रमघाट म्हणजेच कन्नडच्या घाटात सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. वाहतुक कोंडीमुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असल्यामुळे औम घाटातील जड वाहतुक आजपासून बंद केली आहे.
जळगाव सिल्लोड फुलंबी- खुलताबाद मार्गे कन्नड कडे जाणारी वाहतुक ही जळगाव-सिल्लोड फुलंब्री औरंगाबाद मार्गे दौलताबाद टि पॉईट- कसावखेडा-शिऊर बंगला-नांदगाव मार्गे चाळीसगाव जाईल तर औरंगाबाद ते कन्नड मार्गे चाळीसगाव-धुळे जाणारी जड वाहतुक ही औरंगाबाद ते दौलताबाद टि पॉईट - कसाबखेडा - शिऊर बंगला- तलवाड़ा- नांदगाव मार्गे चाळीसगाव मार्गे जाणार असून चाळीसगाव - कन्नड औरंगाबाद कडे - येणारी जड वाहतुक ही चाळीसगाव - नांदगाव तलवाड़ा- शिऊर बंगला - कसावखेडा - दौलताबाद टि पॉईट औरंगाबाद जाईल.