Crime News
Crime NewsTeam Lokshahi

बंदुकीचा धाक दाखवून, जोडीनं करायचे चोरी; पोलिसांनी सापळा रचून केली रंगेहाथ अटक

आरोपी एका ठिकाणी चोरी करायला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : शहरात बंदुकीच्या जोरावर खंडणी मागण्याच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी (Mumbai Police) एका जोडप्याला पिस्तुलासह रंगेहात अटक केली आहे. हे जोडपं पिस्तूल घेऊन कांदिवली परिसरात येणार असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक केली. चौकशीत जोडप्याने पिस्तुलाच्या जोरावर कांदिवली (Kandivali) आणि परिसरात आपला धाक निर्माण करत खंडण्या गोळा करण्याचा प्लॅन केल्याचे निष्पन्न झाले.

Crime News
IAS पूजा सिंघल यांना अटक, ED ची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या जोडप्यावर चारकोप, एमएचबी, मालवणी, मालाड आणि कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी, स्नॅचिंग, खंडणी व इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदम शेर महंमद खान उर्फ ​​बंटी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून, वय 28 तर आहे. तर महिला आरोपीचं नाव श्वेता सूर्यकांत लाड उर्फ ​​बबली, वय २४ वर्षे असे सांगितलं जातं आहे.

Crime News
"राम जन्मभूमी प्रकरणात आम्ही वकील होतो, लवकरच अयोध्येला जाणार"

दरम्यान, प्रकरणातील आरोपी शेर महंमद खान उर्फ बंटीविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असून, त्याची गर्लफ्रेंड आरोपी महीलेविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत, बंटी अनेकदा तुरुंगातही गेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com