जळगावात राजकीय वातावरण तापलं! एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक

जळगावात राजकीय वातावरण तापलं! एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक चकमक

एकच घरात सर्व पदे पाहिजे, कुटुंबापुरताच त्यांचा पक्ष आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली होती.
Published by :
shweta walge
Published on

एकच घरात सर्व पदे पाहिजे, कुटुंबापुरताच त्यांचा पक्ष आहे, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली होती. यावरच प्रत्युत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांनी घरात कशाला आमदारकी आणि नगराध्यक्ष पद पाहिजे अशा शब्दात उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

गिरीश महाजन यांच्या घरात गेल्या 30 वर्षांपासून पत्नी साधना महाजन या सरपंचनंतर जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष झाल्या, गिरीश महाजन हे स्वतः गेल्या २० वर्षांपासून आमदार आहे. मग त्यांनीही इतरांना संधी द्यावी, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे .

गावीत असतील, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, असतील अशी भाजपमध्ये एकच घरात पदे असल्याची अनेक उदाहरणे आहेत, ही गिरीश महाजन यांना दिसत नाही का..?

घराणेशाही असते तर लोकांनी मला एकाच घरात पद्धतीने नसती लोक मला तरी देतात. मात्र गिरीश भाऊंना आपल्या घरात आमदारकी आणि नगराध्यक्ष पाहिजे त्यामुळे गिरीश भाऊंनी याचे उत्तर दिले पाहिजे असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

अजित पवार मुस्लिम आरक्षण

अजित दादा पवार यांनी अल्पसंख्याकांना आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे यात सुद्धा आता संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. तर हा प्रश्न सुटू शकेल अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या आग्रही मागणीवर बोलताना मंत्री गिरीश महाजन यांच्या वर केली आहे.

संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी केले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. धनगर आरक्षणातही गिरीश भाऊंनी मध्यस्थी केली मात्र तो सुद्धा प्रश्न सुटलेला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही. अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीबाबत काय म्हणाले?

शरद पवार यांच्या मनात काहीही चाललेले नाही. शरद पवार यांनी वारंवार सांगितल आहे, की महाविकासासाठी व इंडिया आघाडीच्या सोबत आहे. त्यामुळे शंका घेण्याला काही जागा राहू नये, उत्तर शरद पवार आणि गौतमी आदमी यांच्या भेटीवरून टीका करत असलेल्यांना राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com