भरधाव कामाख्या एक्सप्रेसला धडकला बुल्डोजर, अन्...
जळगाव | मंगेश जोशी : पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकावर भरधाव कामाख्या एक्सप्रेसला बुलडोजर धडकला आहे. कामाख्या एक्सप्रेसच्या लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. रेल्वे प्रशासनानं तातडीने आपघातग्रस्त बुलडोजर बाजूला करत कामाख्या एक्सप्रेस पाचोरा रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. पाचोरा रेल्वे स्थानकावर शती ग्रस्त झालेलं इंधन बाजूला करून वरून इंजिन मागवून दोन ते अडीच तासानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली.
भुसावळ कडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस कामख्या सुपरफास्ट एक्सप्रेस ला पाचोरा नजीक असलेल्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे लाईनच्या सिमेंट ब्लॉक बसवण्याचे काम करणारा बुलडोजर धडकला असून इंजिन धडकल्याने बुलडोजर काही अंतरापर्यंत फरफटत गेले त्यामुळे मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बुल्डोजर रेल्वे रुळा नजिक असल्याचे लोको पायलट च्या निदर्शनास येताच लोकोपायलट ने लांबुनच हॉर्न वाजवत बुलडोजर चालकास सूचना दिली मात्र बुलडोझर चालकाने याकडे दुर्लक्ष केल्याने धोक्याची परिस्थिती लक्षात घेता लोको पायलट ने प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टळला, सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान घटनेनंतर कामाख्या एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली तसेच भुसावळ वरून इंजिन मागवून क्षतिग्रस्त झालेले इंजिन बाजूला दुसरे इंजिन लावून दोन ते अडीच तासानंतर कामाख्या एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली.