MNS
MNSTeam Lokshahi

विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा अन्यथा उग्र आंदोलन करू - मनविसेचा आरटीओला इशारा

मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेकडून कल्याण आरटीओला देण्यात आला
Published by :
Sagar Pradhan
Published on

अमजद खान: काही दिवसांपूर्वी अंबरनाथ मध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा एका बस अपघात झाला होता सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेच्या निमित्ताने विनापरवाना बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांचे वाहतूक करणाऱ्या वाहनांचा प्रश्न ऐरणीवर वर आला होता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

MNS
दसरा मेळाव्यावरुन सुरू असलेलं राजकारण दुर्दैवी; शरद पवारांनी टोचले कान

आज मनविसेच्या शिष्टमंडळाने कल्याण आरटीओ ची भेट कल्याण परिवहन क्षेत्रातील सर्वच खाजगी तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नियोजन करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी विनापरवाना बेकादेशीरपणे विद्यार्थ्यांचे वाहतूक करून त्यांच्या जीवित असे खेळणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आरटीओकडे केली तसेच इतर पंधरा दिवसात जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करून असा इशारा देखील मनविसेतर्फे देण्यात आला. तर याबाबत कल्याण आरटीओ कडून कारवाई सुरू असून एप्रिल पासून आजपर्यंत सुमारे १२० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सातत्याने सुरू असल्याचे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com