आठ तासात हत्येचा पोलिसांनी लावला छडा; दोन आरोपी पसार
अमजद खान |कल्याण
Kalyan Police : डोंबिवली एमआयडीसीत एका सुरक्षा रक्षकाची निर्घृणपणो हत्या करुन चोरी करण्यात आली हा्ेती. या प्रकरणात पोलिसांनी आठ तासांच्या आत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे एका रिक्षावर लागलेल्या बॅनरमुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागला आहे. डोंबिवली पूर्व भागातील एमआयडीसी परिसरातील विजय पेपर मिल ही कंपनी काही वर्षापासून बंद आहे. या कंपनीच्या देखरेखीसाठी रात्रीच्या वेळी एका सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. (Kalyan police investigated the murder within eight hours)
मंगळवारच्या रात्री ग्यानबहादद्दूर गुरुम या 64 वर्षीय वयोवृद्ध सुरक्षा रक्षक तैनात होता. त्याचवेळी त्याच्याजवळ काही लोक आले. त्याची हत्या करुन कंपनीतील काही भंगार चोरी करुन पसार झाले. घटनेनंतर कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, एसीपी सुनिल कुराडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. परिसरात एक रिक्षा आली होती. त्या रिक्षावरील बॅनरमुळे रिक्षाची ओळख पटली.
अखेर आठ तासाच्या आत मानपाडा पोलिसांनी टोनी थॉमस डिसील्वा आणि फिराज खान या दोघांना अटक केली आाहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. सुरक्षारक्षक ज्ञान बहादुर यांनी चोरट्यांना प्रतिकार केला म्हणून चोरट्यांनी त्यांना बेदम मारहाण करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी सुनिल तारमाळे आणि अनिल भिसे यांच्या पथकाने सखोल तपास केला आहे. पोलिसांनी चोरीस गेलेला मान आणि एक रिक्षा जप्त केली आहे.