कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक!

कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक!

आंदोलनाची कुणकुण लागताच प्रशासनाने दिलं खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याचे पत्र
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अमझद खान | कल्याण : कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. दोन वयोवृद्ध जखमी झाले. वाहन चालकासह नागरिक खड्ड्यांमुळे हैराण आहेत. कल्याण पूर्वेतील आढवली ढोकळी परिसरात माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात नागरिक खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले, मात्र महापालिका प्रशासनाने वेळेत खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले.

कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक!
Madhya Pradesh Bus Accident : इंदूरहून जळगावकडे येणारी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका (Kalyan- Dombivli Municipal Corporation) प्रशासन दरवर्षी पावसाळाआधी खड्डे भरण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करते. या वर्षी केडीएमसी प्रशासनाने पावसाळाआधी खड्डे भरण्यासाठी पंधरा कोटी पंधरा लाखाची तरतूद केली आहे. मात्र कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर संपूर्ण ठिकाणी खड्डे झाले. अक्षरशः रस्त्याची चालन झाली आहे. वाहन चालकासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ६ जुलै रोजी कल्याण पश्चिम येथील टिळक चौक परिसरात खड्ड्यांमुळे दोन वयोवृद्ध गंभीर जखमी झाले. दोघांचा हाताला दुखापत झाली. दोन दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये राहणारा अंकित थैवा हा तरुण नवी मुंबई येथील घनसोली येथे कामासाठी जात असताना कल्याण बदलापूर रोडवरील खोणी गावाजवळ रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे त्याची बाईक आदळली. अंकित रस्त्यावर खाली पडला. मागून येणाऱ्या महापालिका बसने त्याला चिरडलं. या दुर्घटनेत अंकित याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कल्याण डोंबिवली मध्ये नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

कल्याणमध्ये खड्ड्यांविरोधात नागरिक आक्रमक!
'दुचाकीवरील कॅबिनेट'; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीची जोरदार टीका

नागरिक प्रशासनाविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. कल्याण पूर्वेतील आढवली ढोकली परिसरात तसेच द्वारली परिसरात रस्त्यावर खड्ड्यांमुळे काही वर्षात अनेक जणांचा जीव गेला आहे. परत असा प्रकार होऊ नये यासाठी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात आज नागरिक रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर आले. या नागरिकांमध्ये शाळेकरी मुलांच्या सुद्धा समावेश होता. महापालिका प्रशासनाने लिहून आश्वासन दिले की खड्डे भरण्याचा काम आज पासून सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर हा आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवले पाहिजे जेणेकरून निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com