NHM Recruitment 2022 : वैद्यकीय अधिकारी आणि CHO पदांसाठी भरती, असा करा अर्ज
NHM Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पंजाब (NHM पंजाब) ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, फार्मासिस्ट, क्लिनिक असिस्टंट या पदांसाठी भरती घेण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण ७७९ पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट https://nhm.punjab.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षेची तारीख वेगळी आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना नीट तपासावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला अर्ज करावा लागेल. (job nhm punjab recruitment 2022 national health mission punjab is looking to recruit community health officer medical officers)
NHM पंजाब भर्ती 2022: महत्त्वाच्या तारखा
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 12 जुलै 2022
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदासाठी अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख - 25 जुलै 2022
सामुदायिक आरोग्य अधिकारी पदासाठी परीक्षेची तारीख - ०७ ऑगस्ट २०२२
वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 11 जुलै 2022
वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
वैद्यकीय अधिकारी पदासाठी परीक्षेची तारीख - 26 जुलै 2022
फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 11 जुलै 2022
फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
फार्मासिस्ट पदासाठी परीक्षेची तारीख - 24 जुलै 2022
क्लिनिक असिस्टंट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 11 जुलै 2022
क्लिनिक असिस्टंट पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
क्लिनिक असिस्टंट पदासाठी परीक्षेची तारीख - 31 जुलै 2022
नॅशनल हेल्थ मिशन, पंजाबने जारी केलेल्या माहितीनुसार, ७७९ पदांपैकी ३५० सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांसाठी आणि १०९ फार्मासिस्टसाठी आहेत. याशिवाय 109 क्लिनिक सहाय्यक आणि 231 वैद्यकीय अधिकारी आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावेत, कारण शेवटच्या तारखेनंतर कोणतेही फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.