Jitendra Awhad
Jitendra Awhad

नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले; "सरकारच्या मंत्र्यांनीही पैसे खाल्ले..."

नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळं विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी मोठी प्रतिक्रिया दीली आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Jitendra Awhad Press Conference : देशात नीट परीक्षेचा घोटाळा सुरु असून तपास यंत्रणांनी काही संशयीत आरोपींना अटकही केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरवणीवर आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून त्यांनी मोठी प्रतिक्रिया दीली आहे. आव्हाडांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

महाराष्ट्र सरकारच्या हातात असलेल्या या स्पर्धा परीक्षा व्यवस्थीत घेतल्या जात होत्या. गेल्या चार वर्षांचा अनुभव चांगला नाही. पेपर फुटण्याची कामे महाराष्ट्रात नेहमीच होत आहेत. मी मागणी करतोय की, हे पेपर आता अमेरिकेत प्रिंट करा. विमान ठेवा तिथे, एक तास आधी घेऊन या आणि मग पेपर वाटा. आपल्या इथे दोन-दोन तासात पेपर लीक होतात. जी खासगी एजन्सी पैसे खावून काहीही करु शकते. आतापर्यंत संबंधीत मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. तुमच्या मुलांचं आयुष्य उद्धवस्त झालं असतं, तर तुम्ही काय केलं असतं? नीट परीक्षेत सरकारच्या मंत्र्यांनीही पैसे खाल्ले आहेत.

नीटमध्ये क्लासेस चालवणारे आणि आपले विद्यार्थी पहिले आहेत, असं दाखवून अॅडमिशन घेणाऱ्यांचा मोठा संबंध आहे. कारण त्यांची फी गरीबांना न परवडणारी आहे. या दुसरा अर्थ असा, गरिबांनी आता शिक्षणापासून वंचित राहावं. पैसे असले तरीही अॅडमिशन वशिलाने मिळतील. नुसता पैसा नाही कामाचा नाही, तुमचा कॉन्टॅक्ट व्यवस्थित पाहिजे. तो कॉन्टॅक्ट नसले तर तुम्हाला काहीही मिळणार नाही.

या देशाच्या ७०-७५ वर्षांच्या इतिसाहात शिक्षणाची एव्हढी वाईट अवस्था कधीच झाली नव्हती. कोणत्याही परीक्षेत तुम्ही गुणवत्ता तपासणार नसाल, तर केवळ वशिल्यावर पोरं घेणार असाल, तर त्या देशाचं भविष्य अंधारात आहे. तरुण वयाच्या पोरांच्या आयुष्याशी खेळून तुम्ही लोकांच्या आई-वडीलांच्या भावना दुखावतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com