मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काय अंदाज नाही गुन्हा कोणताही असो तोही सांगता येणार नाही
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विकास मिरगणे, नवी मुंबई

आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते कधी रात्री उचलून निघून घेऊन जातील याचा काय अंदाज नाही गुन्हा कोणताही असो तोही सांगता येणार नाही माझ्या आयुष्यात पहिले 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले आजकाल बाई दिसली तर मी चार फूट लांब पळतो मी आता शपथ घेतली की बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श करायचा नाही. राज्याची माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवात ते बोलत होते.

सरकार म्हणजे कहर आहे ज्या पद्धतीने सरकार वागत ती पद्धत कौतुकास्पद आहे हम करो से कायदा. ठीक आहे थोडे दिवस हुकूमशाही ही लोक सहन करतील, हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही लोकशाही वर आता विश्वासच नाहीये. ठाण्यामध्ये टिपून टिपून मारताहेत मुख्यमंत्र्यांना असे वाटते की अख्ख ठाणे माझ्या हातात असावं एवढं वर्ष राजकारण शरद पवारांनी केलं त्यांचं बारामती झालं नाही असा टोला आव्हाड यांनी मुख्यमंत्री यांना लगावाला आहे.

त्यांना साथ दिली नाही तिचं हॉटेल तोडून टाकलं , ज्यांनी साथ दिली नाहीतर त्यांचं घर तोडून टाकलं,म्हणजे cm नाही तर व्हाईसरॉयऑफ महाराष्ट्र आहे असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे असताना तीन चा वार्ड असावा असे नक्की झाले 1500कोटी खर्च झाला आता म्हणतात चार चा वार्ड करा आपल्या खिशातून कुठे जाणार आहे परत 1500कोटी जाणार असा सवाल आव्हाड उपस्थित केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे तरी कुठे? बोलायला तरी पैसे कुठे लागत आहेत. मुंबई ही सर्वांची आहे मुंबई ही सर्वांची पोसणारी आई आहे, ही आई पोसनारी आहे म्हणून मुंबईकडे लोक येतात. ह्या मुंबईच्या तुकडा पडण्याच्या काम सुरू आहे.

मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईसरॉय ऑफ महाराष्ट्र; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'या' संकटाने पाकिस्तानला खोल खाईतच ढकलले; सामनातून सांगितली पाकिस्तानमधील परिस्थिती
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com