Jitendra Awhad
Jitendra Awhad

अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड का केलं? जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले, "सुनील तटकरेंनी..."

तुम्ही आरएसएसविरोधात बोलू शकत नाहीत. तुमची एव्हढी केविलवाणी अवस्था झाली आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Jitendra Awhad On Sunil Tatkare : दादांचं बंड झालं, यामागे तटकरेंनी कटकारस्थान रचलं होतं. तुम्ही अनेक वर्ष साहेबांच्या मागे लागला होता की, भाजपात चला. साहेब या गोष्टीला कधीच सहमत झाले नव्हते. साहेब म्हणाले चर्चा करा. लोकशाहीत कोणतीही चर्चा बंद होता कामा नये. तुम्ही विचारधारा सोडलीत, तुमचं काय झालं आज. तुमच्यावर आरएसएस काय बोलली, तुम्ही ओझं झालात. तुमचा पक्ष हे ओझं आहे, असं ते म्हणाले. मला हे मान्य नाही. पण तुम्ही आरएसएसविरोधात बोलू शकत नाहीत. तुमची एव्हढी केविलवाणी अवस्था झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत म्हणाले, सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत माझं नाव न घेता उल्लेख केला की, मी अजितदादांचं नाव घेतलं. अजितदादांचं नाव पुढे करून माझ्यावर हल्ला करायला त्यांना आवडतं. त्यांची ती नेहमीची सवय आहे. ते तटगटकरे यांनी स्वत:च्या पक्षात काय चालू आहे, ते बघावं. साहेब नेहमी तुम्हाला तारखा द्यायचे. भाजपात जाऊयात म्हणून तुम्ही साहेबांच्या मागे लागले होते. साहेबांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं. २००९ चा फॉर्म्युला तुम्ही साहेबांना दिला होता. तुम्ही २०१४ ला साहेबांवर दबाव टाकला होता.

साहेबांनी तुमच्यावर दबाव टाकला नव्हता. २०१६ चाही फॉर्म्युला भाजपकडे जाऊन तुम्ही आणला. २०२९ लाही तुम्हीच फॉर्म्युला आणला. त्यानंतर साहेबांनी दोन बैठका घेतल्या. पुण्यात एक गुप्त बैठक घेतली. दादा, तुम्ही (सुनील तटकरे) आणि धनंजय मुंडे हे तिघे बोलत होते आपण जाऊया. तेव्हा हसन मुश्रीफही आमच्यासोबत होते. मकरंद पाटीलही आमच्यासोबत होते की नाही जायचं. आपण समविचारी पक्षासोबत राहूया, असं ते म्हणत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com