अबू आजमी यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
आमदार अबू आजमी अजित पवार गटात जाणार असल्याची जोरदार चर्चांणा उधाण आलं होतं, यातच आमदार जितेंद्र आव्हाड कुलाबामध्ये अबू आजमी यांची भेट घेतली. या भेटीमुळे आव्हाड यांच्याकडून अबू आजमी यांना शरद पवार गटात घेऊन जाण्याचा प्रयत्न तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे? यातच अबू आजमी यांच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, मोठा माणूस आहे, धंद्यात मोठा आहे, मुस्लिम सामाजामध्ये नाव मोठं आहे. सगळ्यांचीच इच्छा असेल अबू भाई आम्हाला भेटलं पाहिजे म्हणून. माझ्या सारखा छोटा भाई अबू भाईला भेटायला येतो. अबू आजमी इडिंया आघाडी सोबत आहेत. असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. शरद पवार साहेबांनी सांगितले म्हणुन आज अबू आझमी यांना भेटायला आलो आहे. ते कुठेही जाणार नाही.
यावरच अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले की, मी नाराज नाही मी कुठेही जाणार नाही. मी महाविकास आघाडी सोबत आहे. आमची नाराजी दूर केली आहे. रहीस सेख सोबत चर्चा झाली आहे. मी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. जितेंद्र आव्हाड हे माझे मित्र आहे. भिवंडी बाबत कुठलीही चर्चा झाली नाही. पण आम्हाला एक जागा मिळायला पाहिजे होती अशी माझी भूमिका होती. माझ्या पायाचे ऑपरेशन झाल्याने मी प्रचाराला जात नहीं आहे.