'झारखंड पाडण्यासाठी BJPचं षडयंत्र'; आमदारांकडे कॅश सापडल्यानंतर काँग्रेस आमदाराचा लेटर बॉम्ब

'झारखंड पाडण्यासाठी BJPचं षडयंत्र'; आमदारांकडे कॅश सापडल्यानंतर काँग्रेस आमदाराचा लेटर बॉम्ब

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा सहभाग असल्याचंही जयमंगल सिंह यांनी पत्रात लिहिलं आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

झारखंड कॅश घोटाळ्यात एकापाठोपाठ एक नवीन आरोप समोर येत आहेत. दरम्यान, झारखंडमधील काँग्रेस आमदारानं आता या प्रकरणात लेटर बॉम्ब फोडला आहे. बर्मो विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार जयमंगल सिंह यांनी हावडा येथे पकडलेल्या आमदारांवर आरोप केले आहेत. यासोबतच झारखंडमधील सरकार पाडण्याचा कट होता आणि त्यात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा सहभाग असल्याचंही जयमंगल सिंह यांनी पत्रात लिहिलं आहे.

कुमार जयमंगल सिंह यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, या तीन आमदारांनी त्यांना भेटण्यासाठी कोलकात्यामध्ये बोलावलं होतं. जयमंगलच्या म्हणण्यानुसार, यानंतर तिघांनाही गुवाहाटीला घेऊन जायचं होतं आणि मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांना भेटण्याची योजना होती. या पत्रात काँग्रेस आमदारानं लिहिलं आहे की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या लोकांना काही खास आश्वासनं दिली होती. त्यानुसार झारखंडमधील काँग्रेस आणि झामुमो सरकार पाडण्याचा कट होता. यानंतर नव्या सरकारमध्ये आमदारांना मंत्रीपदं आणि १० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

'झारखंड पाडण्यासाठी BJPचं षडयंत्र'; आमदारांकडे कॅश सापडल्यानंतर काँग्रेस आमदाराचा लेटर बॉम्ब
संजय राऊत यांना रात्री १२ वाजता अटक

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचंही वक्तव्य या प्रकरणी समोर आलं आहे. काँग्रेसचं सर्वोच्च नेतृत्वही आमच्या संपर्कात असतं. मात्र, आम्ही राजकारणावर बोलत नाही. मुख्यमंत्री बिस्वा म्हणाले, मी 22 वर्ष त्या पक्षात होतो. त्यामुळे आमच्यात संपर्क-संबंध आहे. कुमार जयमंगल यांच्या आरोपांवर ते म्हणाले की, यावर एफआयआर का नोंदवला गेला हे मला माहीत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com