Jayant Patil : निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात केली आहे.
आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे सामान्य नागरिक, वाहतूकदार, व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. कालपर्यंत मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106.25 आणि डिझेल 94.22 होते तर आता 2 रुपये कमी झाल्यानंतर पेट्रोल 104.15 आणि डिझेल 92.10 दर आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका आल्या की पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे. हे आता नित्याचेच झाले आहे. वाढलेले ४० रुपये व कमी केलेले २ रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते. कमी झालेले २ रु. पुन्हा वाढणार नाहीत याची गॅरंटी काय? असे जयंत पाटील म्हणाले.