बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये - जयंत पाटील

बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये - जयंत पाटील

MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मिनाक्षी म्हात्रे, मुंबई

एमपीएससीच्या विद्यार्थी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करावी. तसेच अभ्यास करण्यासाठी किमान 5 ते 6 महिने वेळ मिळावा.नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रवार आधारित आहे. त्यामुळे पुस्तकं उपलब्ध नाहीत. त्यात सुधारणा करण्यात यावी या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेतली.

हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये - जयंत पाटील
MPSC Student Protest : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com