jayant patil on bjp
jayant patil on bjp

"भाजप जोर जबरदस्ती करतं, दादागिरी करतं," जयंत पाटील यांचा घणाघात

"ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो", असल्याचे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केला होता. हा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर घणाघात केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुस्तकामध्ये नेमका काय केला दावा? ईडीच्या कारवाईतून मुक्तता व्हावी म्हणून भाजपसोबत गेलो असल्याचे छगन भुजबळ यांनी वक्तव्य केल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केला होता. हा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी फेटाळून लावला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर घणाघात केला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, केवळ आपले सरकार बसावे यासाठी भाजप कशाप्रकारे जोर जबरदस्ती करतं, दादागिरी करतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी आहे. जोरजबरदस्ती करून भाजपने स्वतःचे सरकार बसवले खरे पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या चिंधड्या केल्या. मी मागेच एकदा म्हणालो होतो की जे लोक फुटून तिकडे गेले होते, त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना फार आधीपासूनच ब्लॅकमेल केलं जायचं. वरील विधानाने त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे असेही ते म्हणाले.

jayant patil post
jayant patil post

तसेच ही विधानसभा निवडणूक भाजपसारख्या असंवेदनशील आणि संधीसाधू पक्षाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची नामी संधी आहे. भाजपची दादागिरी संपवण्याची, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वाचवण्याची, महाराष्ट्र धर्म रक्षणाची हीच ती वेळ असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

पुस्तकामध्ये नेमका काय केला दावा?

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या '2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ यांच्या पुस्तकातील 'हमारे साथ ईडी है' या शीर्षकाच्या प्रकरणात महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न राजदीप सरदेसाई यांनी केला आहे.

"दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती', असे सांगून भुजबळ हे देशमुख यांच्या आरोपांचा दाखला देतात. 'तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल', असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत, अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.’

"अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली" राजदीप सरदेसाई यांनी छगन भुजबळांनी हे वक्तव्य केल्याचा दावा पुस्तकातून केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com