जयंत पाटलांनी पराभवाचे खापर शिवसेना UBTवर फोडलं
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. मविआचे तिसरे उमेदवार शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला. जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची 12 मतं मिळाली, अपेक्षेप्रमाणं काँग्रेसच्या आमदारांची मतं न मिळाल्यानं जयंत पाटील यांचा पराभव झाला. विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावर भाष्य करताना मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याचा उच्चार पुन्हा करतानाच पराभवाचे खापर उबाठा शिवसेनेवरती देखील फोडले आहे.
महाआघाडी कडून दोनच उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता. मात्र शिवसेने आयत्यावेळेस तिसरा उमेदवार दिला यामुळे शरद पवार देखील नाराज झाल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसनेही त्यांच्याकडे असलेली अधिकची मते दोन्ही उमेदवारांना विभागातून दिली असती, तर निकालाचे चित्र वेगळे असते.
दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांनी शेवटच्या क्षणी त्यांनी मला मते दिली नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्याचवेळी विधान परिषद निवडणूकीत आमदारांची मते २५ कोटींना विकत घेतली गेली असा दावाही त्यांनी केला.
अलिबाग- विधान परिषद निवडणूकीत झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे दुःख मलाही आहे. पण मी विधान परिषदेवर लवकरच पुन्हा निवडून येईन, असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.