Jayant Patil: मविआत राष्ट्रवादी SPचा मुख्यमंत्रिपदावर दावा, जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil: मविआत राष्ट्रवादी SPचा मुख्यमंत्रिपदावर दावा, जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मविआमध्ये राष्ट्रवादी SPचा मुख्यमंत्रिपदावर दावा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी SP ने मुख्यमंत्री व्हाव असं लोकांना वाटत आहे. मविआ एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

मविआमध्ये राष्ट्रवादी SPचा मुख्यमंत्रिपदावर दावा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी SP ने मुख्यमंत्री व्हाव असं लोकांना वाटत आहे. मविआ एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे. तर मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नेमका कोण असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाईल अस सांगण्यात आलं होत आणि कॉंग्रेसने देखील तशी भूमिका घेतलेली होती. यावर पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठ वक्तव्य केलं आहे.

जयंत पाटील म्हणाले की, पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे. लोकसभेच्या निवडणूकीत ही आम्ही पक्षांतर्गतचं म्हणत होतो 14-15 जागा लढवू शकतो आपण. पण शरद पवार यांनी महाविकास आघाडी व्यवस्थीत व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मला आदेश दिले की, हे सोडून द्या ते सोडून द्या त्यामुळे शदर पवार यांची भूमिका नेहमी त्यागाचीच राहिलेली आहे आणि आघाडी शाबूत राहावी यासाठी ते जास्त प्रयत्न करतात असं मला वाटतं. मविआ एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

त्याचसोबत पुढे ते म्हणाले की, अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्या दोघांमधे अंतर आहे, आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मनासारखं महाराष्ट्रात काम करता येत नाही. त्यामुळे त्यांची पंचायत आहे, बाकी दोघे सत्तेसाठीच गेले आहेत तसेच जनतेने अमान्य केलेलं हे त्रिकुट आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com