मराठवाड्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली; जायकवाडी धरण 90 टक्के भरलं

मराठवाड्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली; जायकवाडी धरण 90 टक्के भरलं

मराठवाड्याची पाणी चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सुरेश वायभट, पैठण

मराठवाड्याची पाणी चिंता मिटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जायकवाडी धरण तब्बल 89 टक्के भरलं असल्याची माहिती मिळत आहे. संभाजीनगर, हिंगोली, बीड, परभणीचा पाणीप्रश्न आता मिटल्याचे पाहायला मिळत आहे. जायकवाडी धरणात 20 हजार क्युसेक वेगाने आवक सुरू आहे.

सध्या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आसल्याने जायकवाडी धरणातील पाण्याच्या उंच लाटा उसळत आहेत. संध्याकाळी जायकवाडीतून पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती मिळत असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com